बलसागर भारत होवो.......ओळ काव्य लेखन
बलसागर भारत होवो.......ओळ काव्य लेखन
राष्ट्रार्थ जवान हे लढले, भारतभूचे हृदय तळमळले,
स्वर्णाक्षरात मोती हे जडले, देशात पसरला टाहो
*बलसागर भागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो............।।1।।*
देशाभिमानास हृदयी जपले, देशरक्षण्या जवान हे लढले,।
मरणोपरांतही शिखर जे चढले,एकच आस तिरंगा फडकत राहो।
*बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो...........।।2।।*
शत्रूस निस्तनाबूत असे केले, वक्रदृष्टींचे थरकाप उडाले,।
विजयपताकांनी अंगण सजले, दैदिप्यमान भारत विजयी होवो।
*बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो...............।।3।।*
अन्यायाविरुद्ध आवाज हे चढले, भ्रष्टाचारी उताणे पडले,।
दारिद्र्याचे कुंपण फाडियले,भारतभू हे सदा वैभव पाहो।
*बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो..............।।4।।*
समृद्धीचे डोंगर सजले, विश्वमांगल्याचे बीजही रूजले,।
तिरंग्यासामोरी नत मस्तक हे झुकले,आदरभाव सदा उजळत राहो।
*बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो ...........।।5।।*
