बळीराजाला सुखी ठेव माझ्या
बळीराजाला सुखी ठेव माझ्या
रखरखत्या धरतीवर
कोसळणारा पाऊस,
बळी राजाच्या मनाची
पूर्ण होईल हौस.
एकच स्वप्न नजरेत त्याच्या
पाऊस येवो अंगणी माझ्या,
हिरवीगार होऊ दे धरती
सुखावेल मग बळीराजा.
शेतकरी कष्टाना घाबरत नाही
शेतकरी दुःखाला हरत नाही,
निसर्गाच्या तालावर नाचत राहतो
निसर्ग राजाची कठपुतळी होतो.
पावसाने जर मेहेरबानी केली
धन धान्यांची बरसात झाली,
दिस चांगले सुखाचे येतील
आत्महत्या ही नाहीश्या होतील.
नजरेतील स्वप्न सत्यात उतरतील
पुढच्या पिढ्याही शिक्षण घेतील,
शिकून सवरून शहाण्या होतील
बळीराजाचे पांग फेडतील.
एवढेच उपकार कर देवा महाराजा,
बळीराजाला सुखी ठेव माझ्या.
