बळीराजा
बळीराजा


सर्जा राजाची जोडी
शेतात नांगरते
त्यांच्या कष्टाने शेतात
पिक मोत्याचे पिकते ।।1।।
शेतात मशागत तो
नांगरणी पेरणी खुरपणी
बाप घाम गाळुन करतो
वरुण राजा बरसुन देई पाणी ।।2।।
उभी पिके बहरून येती
मन भरून येई
तेव्हा त्या बळीराजा चे
अभिमान वाटे बाप माझा आहे शेतकरी ।।3।।