बळीराजा
बळीराजा
एकेक अन्नाच्या दाण्यासाठी
बळीराजाचे अपार कष्ट असतात
तरीही माहीत नाही मला
लोकं असं अन्न वाया का घालवतात?
कुठल्याही परिस्थितीत त्याला
शेती पिकेल ह्याची आस असते
पण अकाली पाऊस दुष्काळ
ह्याने त्यावर संकट कोसळते
आपल्या देशातील प्रत्येक घराघरांत
साठा असावा धान्याचा त्याला वाटते
पण अन्न पिकवणाऱ्याच्याच घरात
आपल्याला ठाऊक नाही काय शिजते?
कर्जबाजारी होऊन घरदार पडते ओसाड
त्याच्याच घरात सुखसोयींचा अभाव
बळीराजा डाव अर्ध्यावरच संपवतो
कुटुंबाचा त्यामुळे लागेना निभाव
शेतीच नाही पिकवली त्याने तर
काय मिळणार ताटात जेवायला
कधी सुधारणार त्याची परिस्थिती
कळेल का मोल त्याचे आपल्याला?
ठेवू या जाण त्याने गाळलेल्या घामाची
नको ती उगाच नासाडी अन्नाची
भरू देत त्याचे कोठार धनधान्यानी
हसू देत पाहून तो स्वप्ने सुखी कुटुंबाची
आत्महत्या हाच बळीराजा नाही उपाय
सरकारनेही सवलती मोफत त्यास द्याव्यात
अन्नदाता बळीराजा खरोखरी तूच महान
निघेल काही मार्ग आशा अशी करूयात
