STORYMIRROR

Gangadhar joshi

Abstract

4  

Gangadhar joshi

Abstract

बळी राजा

बळी राजा

1 min
351

पुसलं कुंकू फुटली काकण

काळ्या आईची कशी करावी राखण


भेगाळली माती झुरले ते मन

डोक्यावर बसलं सावकारी ऋण

दुष्काळी सावट आला धोंडा मास

डोळ्यांनी दिसत जीवन्त मरण


पडेना पाऊस कशी करावी पेरणी

रुसला मेघराज रुसली ती धरणी

कस पेटवावी चुल भुकेची भरणी

 इथे रचावी लागते स्वतःचे सरण


नदी नाले आटले आटले डोळ्यात पाणी

जीव व्याकुळला कोण देईल का पाणी

कसा संसाराचा गाडा कुठला हो सण

घेतला धन्यानी हो गळफास संपलं जीवन 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract