बळी पिकवतो मोती
बळी पिकवतो मोती
बळी पिकवितो मोती
करी प्रयत्न ते अती,
कशी सोसुनिया कळ
आयुष्याचे गीत गाती....।।
बळी तुझ्या घामामुळे
आयुष्याची होती फुले,
येत नाही सांगताच
काय तू आम्हांला दिले...।।
दुःख मनी बाळगून
कष्ट करीत राहिला,
निसर्गाचा प्रकोप तू
सदा झेलत राहिला....।।
नाही घेत कधी सुट्टी
नाही केली कधी मजा
जगतोस जगासाठी
पिकवून मोती, राजा....।।
बळी तुझ्या घामामुळे
सुखावर तुझ्या गदा,
एक मागणे देवाला
सुखी ठेव तुला सदा....।।
