एकटी
एकटी
जरी मी एकटी
तरी मी रणरागिणी,
हरणार नाही कोठेही
लढेल सदा मी सौदामिनी...!
परंपरेची उखडून पाळेमुळे
मी जिंकण्यास तयार हे जग,
यशमार्गावर सदैव वाटचाल
वळुनी बघणार नाही मग...!
जरी मी एकटी
नाही मला त्याची खंत,
तेजस्विनी बनुनी मी
राहील सदा किर्तीवंत.....!
मी आहे कोमलहृदयी
ओळख माझी खरी ममत्व,
आपुलकी, माया, कणव
यांचे मला उत्तरदायित्व....!
