सिद्धीविनायक
सिद्धीविनायक
1 min
153
गणपती...
सदानंद, सर्वेश्वर सकलांचा
साजिरा, सुखद सूत्रधार,
सिद्धिविनायका सामर्थ्यदाता
सीस सिंदूरवदना स्थावर....!
सुबुद्धीदाता, सुपाणी, सुंदर
सूर्पकर्णीचे सदा स्मरण,
सेवक सायुध सामर्थ्यशाली
सैरभैर सेवकांचे स्फुरण....!
सोबती सुखाचा संसारी
सौजन्य, सात्विकतेची संस्कृती
स संवृद्धि संस्मरणीय संकटी
सः सःकारण सत्कार्यासि स्मरती....!
