STORYMIRROR

Ujwala Ingale

Inspirational

3  

Ujwala Ingale

Inspirational

परोपकारी जिणं

परोपकारी जिणं

1 min
236

या कळ्यांनो, या फुलांनो

गंध हा उधळू चला,

मानवाला आनंदाची

मेजवानी देऊ चला....!

परोपकारी बनून

चंदनापरी झिजू या,

आपला सुगंध सारा

धरेवर पसरवू या...!

वृक्षासम सदा आस

दुजा देण्यास ठेवू या,

आयुष्य संपेपर्यंत

जीवनदान करू या...!

जल देण्या मानवांस

सरितासम वाहू या,

भूमीवर लोकमाता 

अशी कीर्ती मिळवू या...!

निसर्गाची महानता

नजरेपुढे ठेवूया,

अल्पायुषी असूनही

दवासम चमकू या...!

कळीचे होताच फूल

गंधीत जीणे जगू या,

जीवनात ईश्वरचरणी 

तल्लीन सदा होऊ या....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational