पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
246
येता पहिला पाऊस
स्वप्न वसुधेचे फुलले,
भूगर्भातील ते अंकुर
हरित सृष्टीने बहरले...।।
मृगाची लागता चाहूल
आला पाऊस अंगणी,
हृदयाच्या काळोखात
ओल्याचिंब त्या आठवणी...।।
आला पाऊस शब्दांचा
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात,
बेधुंद विचारांची झाली
कविता मनाच्या कोपऱ्यात...।।
आला पाऊस स्नेहाचा
बहरली प्रीत सुमने,
आयुष्याला मिळाला गंध
मन गाती सुंदर कवणे...।।
आला पाऊस स्मृतींचा
चिंब झाल्या आठवणी
मन रेंगाळते भूतकाळात
अश्रूंची फुले लोचनी...।।
