बलात्कार
बलात्कार
सांग ना ग मम्मा बलात्कार काय असतो
माणूस बायांना का मारत असतो
पेपरात रोजच वाचायला भेटते
बलात्कार झालेली एक तरी बातमी असते
सांग ना ग मम्मा बलात्कार काय असतो
मुलगा मुलींनाच का मारत असतो
सांग ना ग मम्मा बलात्कार काय असतो
माणसं छोट्या मुलींना पण का मारत असतात
मी रेडिओ रोजच ऐकत असते
त्या बातमीत माणूस छोट्या मुलींना मारत असते
बलात्कार म्हणजे छोट्या मुली आणि बायकांना
मारणे, जाळणे, पेट्रोल टाकने ..म्हणजे बलात्कार असते?
सांग ना ग मम्मा माणसांना बाया का नाहीत मारत
त्यांना पेट्रोल टाकून, रॉकेल ओतून का नाहीत जाळत?
माणसांवर बाया बलात्कार का नाही करत?
शाळेत मुलांनी मारले की आम्ही मुलांना मारतो
मग ते आमच्या वाटी नाही जात.
