प्रेमांकुर
प्रेमांकुर
तुझी साथ मिळाली मी नवीन स्वप्न साकारली
मी सूर्य मिळविण्याची इच्छा बाळगली
आधी वाटले माझा हात भाजेल
म्हणून मी खूप खूप घाबरली
पण तुझ्या प्रेमाची साथ मिळाली
मी सर्व स्वप्ने सहज साकारली...दिलू
दिलू तुझी प्रेमळ साथ मिळाली
नी जीवन माझी ज्योत आकारली
मी जीवनाचा आराखडा तयार केला
नाही पूर्ण होणार आधी वाटले
पण तुझ्या मार्गदर्शनाची कास मिळाली
आणि माझे जीवन घडवून गेली...दिलू
दिलू तुझी साथ मला मिळाली
अगदी मी हृदयातून आनंदून गेली
तुझ्या संगतीने नजर माझी वेडावली
आधी वाटले गोजिरवाणे हे स्वप्नच आहे
पण तुझ्या प्रतिसादाने माझ्या मनातील
प्रेम रुपी आस माझी खुलली...दिलू
तुझी सहानुभूतीने साथ मिळाली
कूस माझी अंकुरली
तू तू नाही राहिला मी मी नाही राहिले
आपण एकमेकात सामावून गेलो
आणि आपले प्रेमांकुर फुलले ...अनोमा
तुझी साथ मिळाली
अन माझे अंगी अंगी बहरली
माझ्या मनाच्या तळाशी
तुझ्या मनाने खोली गाठली
तुझ्या रंगात मी रंगून गेली
व आपले प्रेम प्रतीक उमलून आले...आयुष्य
