विचारावे तुला
विचारावे तुला
कुणी घडवले मोहक रूप तुझे
मी भाळून जाते बघताक्षणी
कुणी घडविले नशिले नयन तुझे
मी धुंद होते बघताक्षणी
कुणी घडवले लांबसडक नाक तुझे
मन हेलावते बघताक्षणी
कुणी घडवले मोहन ओठ तुझे
मी मोहून जाते पाहताक्षणी
दिसली बाणेदार शरीरयष्टी तुझी
अतृप्ती जाणवते मज बघताक्षणी
मोहून टाकणारा तुझा श्वासाचा सुगंध
दरवळून टाकतो अंगाअंगात माझ्या गंध
सख्या कृष्णासम रंग तुझा रे सावळा
जीव झाला माझा तुझ्यावर बावळा
माझ्या मनामध्ये तू आहे साठला
पण तुझ्या चेहऱ्यावर का दिसेना गंध
माझ्या पप्रेमाचा फुललेला दिलू...
वाटते मज थोड्या वेळेला ज्यावेळी
तु माझ्या घरी होता आला त्यावेळी
मोहरून जातो माझा गोरा चेहरा
मला खुललेला दिसत नाही तुझा चेहरा
प्रश्न पडतो कधी विचारावे तुला
मी पसंत तर आहे ना रे तुला
