बेरीज
बेरीज
1 min
245
तूला बघताच असे वाटले
गेलेल्या आयुष्याची उजळणी
तू करीत असशील......
आणि तुला जाणवत असेल
तू तुझ्या आयुष्यात केली
वजाबाकीच माझी ..........
तुला कळलेही असेल
तू माझी वजाबाकीच केली
आणि मी माझ्या आयुष्यात तुझी......
बेरीजच केली बेरीजच केली
आणि बेरीजच करत आले
जेव्हा हे उमजेल तुला........
तेव्हा तू ही नक्की माझी बेरीज करशील
पण त्यावेळी मी दुर गेले असेल
अगदी खूप खूप दूर ....
आणि तुझ्या हातून कायमची
वेळ निघूनही गेली असेल असेल.....
