लग्न
लग्न
तू आला घरी बोलला कौतुकाने
तुला पाणी देणे हा तर एक बहाणा होता
कारण तुझ्या नयनात नयन घालून बघण्याचा
मला तर एक चान्स होता
कारण बघायला आला होतास तेव्हा
नीट बघितलं नव्हतं तुला खूपच बरे वाटले
आणि तू ज्यावेळी जात होता
पाठमोऱ्या आकृतीकडे तुझ्या आसुसलेल्या
नजरेने मी बघत होते
पण तू वळूनही पाहिले नाहीस
तुझी पाठमोरी शरीरयष्टी बघून
माझे हटत नव्हती दृष्टी
मोह भुरळ पाडत होती
तो डोलदार बांधा जेव्हा बघितला
आणि हृदयाचे स्पंदन वाढले
रूप माझे रोमांचित झाले
पण प्रश्न एकच मनी दाटला
दिल तू वळूनही का नाही बघला
तुला पसंत होते का मी
की घरच्यांच्या मनावरच तू करणार होता
माझ्यासोबत लग्न
पण मी तर तुझ्यामध्ये मनापासून
आधीच झाले होते मग्न.
