STORYMIRROR

Yogita Takatrao

Tragedy

3  

Yogita Takatrao

Tragedy

भ्याड हल्ला

भ्याड हल्ला

1 min
660


हिम्मत नव्हती लढायची रक्तात

म्हणुन भ्याड पणे केला हल्ला

पहाटे तीन च्या साखर झोपेला

एका आत्मघातकीने स्फोट केला


पुलवामा, श्रीनगर, अख्खा भारत

त्या भीषणतेने हादरून गेला

सिआरपीएफ चाळीस जवान

बळी पडले त्या हल्ल्याला


रक्तामासांचा सडा सांडला

पुलवामा भागात

असं भीषण दृश्य होतं

बघवेना अक्षरशः

कोणाच्याही डोळ्यांना


प्रत्येक भारतीय निषेध करत होता

पाठीत मारलेल्या सुरा चा

वाटलं नेहमीप्रमाणेच

केला कांगावा


कुठून मिळालं एवढं आरडीएक्स ?

असा घाणेरडा खेळ मांडायला

कोण तो गद्दार

आपली गाडी देणारा?

याच देशात राहून

आतंकवाद्यांशी सलगी ठेवणारा?


पहिले त्या गद्दाराला

फासावर लटकवा

मग त्या आतंकवादीनां

गोळी मारून कंठस्नान घाला


एवढीच आहे हिम्मत

तर समोरूनच लढा म्हणावं

दरवेळी लपंडावाचे

खेळ बंद करा म्हणावं


आणि परत त्याच त्याच

जातिभेदाची भांडण

लावून पसार नका होऊ

काय वाटलं त्यांना

आम्ही परत जातीभेद करू


छे,आम्ही एकजूट होऊन

ह्या गोष्टीला सामोरे जाऊ

कायमचा जातीयवाद बंद करून

आतंकवादीनां दाखवून देऊ


भ्याड हल्ले बंद करा

नाहीतर आमच्यातले सैनिक

घुसतील तुमच्या अड्डयात

आणि समोर ऊभे राहून

नजरेला कट्टर नजर देत

प्रत्येक जवान करील

एकेक आतंकवादीचा सर्वनाश


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy