STORYMIRROR

Angulimaal Urade

Romance Others

3  

Angulimaal Urade

Romance Others

भूषण

भूषण

1 min
234

सखे तुझ्या प्रेमाची लागली

माझ्या हृदयाला कणकण

मग भटकलो गं मी तुझ्यासाठी

कॉलेजमधील परिसरात वनवन.....//१//


साजने आला फुलारून हा श्रावण

करुनी मी तुझ्या रूपाचे निरीक्षण

मस्तीने धुंद झाले गं माझे जीवन

करतो प्रिये तुला मी वंदन.......//२//


राणी तुझ्या प्रेमाचे

वेचूनिया मी मधुकन

झाले गं सखे

तुझे माझे भावी मिलन

साजनी देऊनिया गेलीस

मजला तू आलिंगन

तेव्हाच जीवन माझे

केले तुला मी अर्पण.....//३//


प्रेम निभाविण्याचे

देऊनी तुजला वचन

सखे केले गं मी

तुझ्या प्रेमाचे रक्षण

करुनिया मी तुझ्यावर

"मार्शल" प्रेमाची उधळण

वाटती गं मजला

आज तुझेच भूषण.....! //४//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance