Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

.प्रमोद घाटोळ

Tragedy

3  

.प्रमोद घाटोळ

Tragedy

भूमिपुत्र

भूमिपुत्र

1 min
624

पांघरी आसवे I भाजतो उन्हाने॥

निधड्या छातीने | दुःख झेली॥

नभात पाहूनी I मेघ पावसाचे॥

दिवस सुगीचे Iस्वप्नी येई॥

सांजेला सकाळी I राहे वावरात॥

बोंदरात रातI कुंदे सारी॥

वाट भविष्याची Iपांदणीत जाये॥

चिंता अंग खायेIपिसू जैशी॥

थेंब पावसाचा I लपंडाव खेळे॥

शेतकरी रडेI पिल्यासाठी॥

पुरस्कारासाठी I लिहे पानोपानी ॥

कोणी न जुमानी Iदुःख त्याचे॥

शुद्राशुद्र गेले Iदारिद्र्य न जाई॥

गरीबीची खाईIत्याचे माथी॥

शेतकरी बाप | राबराब राबे॥

नाशिबाचे धागे |विणे दुजा॥

कुणी तरी सांगा | कसा हा न्याय।।

सोशितो अन्याय | भूमिपुत्र॥

जात कुणब्याची Iखरी एक नेक॥

नाशिबाची टेकIखोट्यापाशी ॥

जगाचा पोशिंदा I जो तो नाडवीतो ॥

शूळी चढवीतो I रक्त त्याचे ॥

बाप अन्नदाता I झाला वनवाशी ॥

पुढाऱ्याची काशी I मालामाल ॥

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy