STORYMIRROR

Sailee Rane

Tragedy

4  

Sailee Rane

Tragedy

भूक

भूक

1 min
469

काय देवा खेळ मांडलायस नशिबाचा

काय गुन्हा केला जन्म घेऊन नारीचा


पुरातन काळापासून आतापर्यंत

भागवतेय भूक या पुरुषांच्या वासनेची

तरीही आजतागायत ठरलीय फक्त

भोगवस्तूच या पुरुषांची


वासनेच्या त्यांच्या या भुकेला

कधीतरी बसेल का रे आळा

रस्तो रस्ती गल्लोगल्ली माजलाय

या पुरुषांच्या भुकेचा रे डोंब


नेहमीच ठरलीय मी त्याच्या

वासनेची बळी

कधी पत्नी म्हणून तर 

कधी प्रेयसी म्हणून


आता तर सरेआम

लुटतायत लेकीसुनांची अब्रू

भुकेलेल्या या नराधमांची

कधीच भागत नाहीय भूक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy