भुक...
भुक...
कोणी करतो उदरभरण
कोणी भरतो पोट
पोटाच्या खळगीसाठी सर्वांची चाले खटाटोप
कोणी पुरवी चोचले जिभेचे,
कोणी भागवी भुक
नाही मिळे कुठे आसरा,
जीव होई भुकेने व्याकुळ सारा
आहे कोणाची चुक?
घाम गाळण्यास कधी मिळेना कुठे काम कामासाठी लागे शिक्षण थोडेफार
ना जाता पोटात कुणाच्या असेच
रस्त्यावर जाते फेकले
नाही समजत मोल कुणाला अन्नाचे
द्यावा कधी घासातला घास आपण भुकेने व्याकुळ अ
सलेल्या व्यक्तीला राहिलो पोटाने अर्थ उपाशी जरी आपण
मिळे मनाने समाधान आपल्याला
भुक शिकवते कधी चोरी,
लटकवते कधी दोरी
वागणे वाईट वा चांगले
भुकेवर अवलंबून असते
सततची उपासमारी मानवाला
दुष्कृत्य करण्याची वेळ आणते
होतात कित्येक मेजवाण्या, केविलवाण्या भुकेने व्याकुळलेल्या जीवाला
अन्न कुठे मिळते?
कित्येक मरतात इथे रोजच्या उपासमारीने पण त्यांच्या भाकरीचा प्रश्न कधी सुटते?
कळते त्यालाच व्याकुळता भुकेची
एक घासाची जाणीव ज्याला आहे तोच जाणू शकतो खरी किंमत अन्नाची
जगण्यासाठी पोटाची भुक ही सर्वांना सतावते भुकेची नसे एक व्याख्या, व्यक्तीनुसार ती बदलते..
