STORYMIRROR

Shital Yadav

Inspirational

4  

Shital Yadav

Inspirational

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

1 min
25.7K


जेव्हा घटती संस्कार
जगी वाढे अत्याचार
कुठल्याही क्षेत्री आज
बळावला भ्रष्टाचार

बळीराजा शेतीमध्ये
कर्ज काढून पेरतो
दर्जा निकृष्ट वाणाचा
पीक नासाडी करतो

शाळा मंदिर विद्येचे
मिळे जीवनाचे धडे
लागे भ्रष्टाचार कीड
जाते ज्ञानालाच तडे

स्वास्थ्य मोठी ही संपत्ती
सुख तिच्याविना नसे
मात्र वैद्य होता भ्रष्ट
मिळे आरोग्य हे कसे

नावावर धर्माच्या भक्त
देती दान हजाराने
नष्ट झाली नितीमुल्ये
भ्रष्टाचार विकाराने

ग्रासे असा भ्रष्टाचार
नेता जरी हे रक्षक
ज्यांच्या हाती सुरक्षा
तेच बनती भक्षक

होण्या देशाची प्रगती
नको असा भ्रष्टाचार
घडो सामाजिक क्रांति
मिळो नवीन विचार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational