भ्रमाचा भोपळा
भ्रमाचा भोपळा
फुटला भ्रमाचा भोपळा
झाले शासनही हतबल
पिडीले विषाणूने जीवा
केलेय मानवास निर्बल
वाजल्या थाळ्याटाळ्या
पळविण्यास या रोगाला
ठाण मांडूनीच बसलाय
काय म्हणावेच भोगाला
आलेया वाट्याला संकट
एक वर्षही बघताच सरले
जीवानिशी गेले कितीतरी
नाही आप्त नातलग उरले
नशिबाने चालवली अशी
मानव्याची असूरीच थट्टा
घालुनी साकडेही देवाला
लागला माणुसकीला बट्टा
मार्ग काढावा कसा यातून
नाही उरला काहीच पर्याय
कसे टाळावे अशा रोगाला
सांगेल का कोणी उपाय
