STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

भरारी

भरारी

1 min
209

ध्येयावर असू दे 

नजर तुझी करारी

 पसरूनी जिद्दीचे पंख घे आकाशी उत्तुंग भरारी


 होतील अपेक्षाभंग 

स्वप्नांची वाट होईल धूसर

 नको जाऊ खचून 

खोच प्रयत्नांचा तू पदर  


 ठरवले आहेस जे मनी 

 प्रत्यक्षात आणावे 

लागेल घडवूनी 

यशाच्या पायरीवर 

टाक पाऊल उमटूनी 


दुःखाचे आभाळ येईल दाटून

सुखाच्या सरींची होईल

बरसात कधी ना कधी तरी  


ठेच, हाच आत्मविश्वास 

येई ऐकू सामर्थ्याची साद

 "उज्वल भविष्य घडव" 

हृदयातून येईल हीच एक हाक  


भिऊ नकोस, यश 

कीर्ती शौर्य अगणित 

ही वाट यशाची चाल 

ओलांडून दिशा समित


 बांध गाठ अशी जिद्द

अन् प्रयत्नांची अंधार पिऊन उजळावी

 कहाणी संघर्षाची.. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational