STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

भरारी

भरारी

1 min
205

साक्षर होऊनीच सखी 

घेतलीस तू गगनभरारी

तुझ्या या सामर्थ्यासाठी

बनलीस विख्यात नारी 


स्वप्न पाहिले डोळ्यांत

टेकण्या आभाळां हात

जीवनातील संकटावर 

केलीस धैर्याने तू मात


घरादारालाही पटलेय

तुझ्या कार्याचे महत्व 

कुटुंब परिवारासाठीही

तूच वेचक असे सत्व


जरी हेटाळले तुला या

जगतामध्ये जरी कुणी 

राहिलीस तू आनंदाने 

नाही काढली उणीदुणी


घरदार मुलाबाळांसाठी

खपली नित्य सर्वांसाठी

मदतीचा तत्परतेने हात 

ठेवलास तुच सर्वांपाठी


हळूवार अशा हृदयाची

तू साक्षात असेच देवता

प्रसंगी बनतेस वाघिणी

शिलावरी ध्यान ठेवता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational