भोवरा
भोवरा


तू सोबत असूनही आज एकटी मी पडले
प्रेमाच्या या भोवर्यात मी पुरती अडकले
निखळणाऱ्या हास्यांमधून बोल तुझे उमटले
निरागस डोळ्यांमधून प्रेम व्यक्त झाले
तुझ्या प्रेमामध्ये मी आकंठ बुडून गेले
सभोवतालचे जग जणू केविलवाणे भासले
हृदयाच्या प्रत्येक स्पंदनातून प्रेम जणू उमडले
वाहणाऱ्या धुंद लहरींमधून प्रेम खूलवू लागले
पण तु मात्र यांमधुनि केव्हाच सावरला
स्वार्थी बनून तु तुझं आयुष्य जगू लागला
माहिती नाही नात्याला नजर लागली कुणाची
तु झाला तृप्त मी मात्र भुकेली तुझ्या प्रेमाची
प्रश्न केला तुला प्रेम तुझे विरले का?
आयुष्यभराची वचने क्षणात अशी विरली का?
उत्तर मिळाले मला प्रेम वैगरे नसतेच जणू
दोघांच्या नात्याला फक्त लग्नाचे बंधन म्हणू
तूझ्या अश्या बोलण्याने मन माझे तुटले
हळुवार पापण्यांतूनी दोन थेंब सांडले
तू सोबत असूनही आज एकटी मी पडले
प्रेमाच्या या भोवर्यात मी पुरती अडकले