महती पुस्तकाची
महती पुस्तकाची
लेख कथा कादंबरी कविता
यांची महती तुझ्याचमुळे रे
तू तर या सगळ्यांचा धनी
पुस्तका, तुझी महती कुणी केली रे?
पुस्तक आहे आपले मित्र
समजून घ्या रे त्याचे चरित्र
कुणी मानले तुला गुरू
तू तर ज्ञानाचा कल्पतरू
गोष्टींमधून केल्या कल्पना
डोळ्यासमोर तो रम्य देखावा
कधी चित्रांच्या मग बनल्या गोष्टी
क्षणात उमगली जीवनसृष्टी
पुस्तकात मग असे हरवले
जाऊन पोहोचले राक्षस राज्यात
वाचवण्या मग परी आल
ी
पुस्तकातून बाहेर घेऊन आली
जेव्हा असेल तू नवा नावाला
बुक-केसमध्ये जागा तुला
जुनी झाली गळली पाने
मग कशाला हवे जुने-पुराने
कधी वस्तू होतो तू अडगळीची
कधी रद्दी तू भेळवाल्याची
पुस्तका एक प्रश्न विचारू का तुला
जाळतात तुला तेव्हा दु:ख होते का तुला?
तेलकट चिवटाने संताप येतो का तुला?
तू मात्र निरूत्तर, गप्प बसावे लागते मला
तू मात्र नवनव्याने घडतच असतो
नवीन रूपात उदयाला येत असतो