तू अन् मी
तू अन् मी


चंद्र-ताऱ्यांची कशी ही नाती
जशी तुझी नि माझी अतुट प्रीती
नको लागाया दृष्ट कुणाची
चल बसूया आपण चांदण्या राती
सांजवेळी भिरभिरतो वारा
गुंज घालूनी देतो पहारा
केसांत माझ्या दरवळला मोगरा
हृदयी साठवू दे तुझा चेहरा
लाटेला मग सोबती किनारा
विचारू पाहे ती सागराला
डोकावून पाहे तू अंर्तमनाला
माझे भाव कळू दे तुला
निळा रंग खुल्या आसमंताचा
लपंडाव सुरू असे ढगांचा
इतके हृदय मोठे असू दे माझे
की हृदयी भाव साठतील तुझे
कधी कडवसा रखरखीत उन्हाचा
पाण्याने मग जीव शांत तृष्णेचा
कधी घरंगळले भाव टप टप गालावर
अन् फुटला मग बांध अश्रूंचा
स्वप्नांची ही भलतीच किमया
कवितेत मांडली स्वप्नांची दुनिया
स्वप्नांनी मग व्हावे साकार
तुझ्याचमुळे रे आयुष्याला आकार