शब्द
शब्द


शब्दांत मांडलेला हा शब्दांचाच खेळ
जीवनातील भावनांचा घातलेला मेळ
कुणाच्या शब्दांतून जाणवतो शब्दांचाच कल्लोळ
कुणाच्या मुखातून पडे शब्द ते निर्मळ
कधी शब्द काटेरी बनले क्षणात घाव जिव्हारी लागले
कधी शब्द जणू पाकात मुरले कडवेपणा गोड करून गेले
कधी गरजेवेळी शब्दही मुकी बनून जातात
गरज नसतांनाही शब्द वाईट गोष्टींचाच पाढा वाचतात
कौतुकाच्या क्षणी शब्दांनी स्तुतीसुमने उधळली
वाईट गोष्टींसाठी शब्दच न्यायाधीश बनली
कित्येक वेळी तर एकच शब्द माणुसकीला जागला
तर दुसर्या क्षणी शब्दाने सरड्याप्रमाणे रंग बदलला
जय भवानी जय शिवाजी शब्दांनी रायरेश्वर गरजले
राजेंच्
या शब्दांखातर स्वराज्याचे पाऊल पुढे पडले
थोर मावळे बलिदान देऊन शब्दांना त्या जागले
श्रेष्ठ ठरले ते शब्द इतिहास घडवुन आले
आंधळ्याची मुलं आंधळी शब्द दुर्योधना लागले
एवढ्याशा त्या शब्दांनी महाभारत घडले
जरी कैकेयीचे शब्द होते गोड वचनबद्ध झालेले
रामाला चौदा वर्षे वनवासाला धाडलेले
आजही हिंदू मुस्लिमांमध्ये होते शब्दांची मारामारी
माणूसकीचे शब्द राहतात दूर बनतात एकमेकांचे वैरी
आई-वडील भाऊ-बहीण माळ नात्यांच्या शब्दांची गुंफली
रिती वाटली माळ त्यात भर अजून शब्दांची ओवली
प्रेमभराच्या शब्दांनी कित्येक नाती जुळली
माणुसकीच्या शब्दांनी माणसांतली माणुसकी टिकवली