निर्भया
निर्भया


कसं सांगू मित्रांनो माझं मलाच समजत नाही
कधी बनले निर्भया हे मला पण कळलं नाही
अहो कालच गर्भहत्येच्या प्रकरणातून मी सुटले होते
अन आज कसं अचानक बलात्काराच्या प्रकरणात अडकले होते
आईच्या गर्भात असताना जग बघायची घाई झाली होती
सगळे आपलेच आहे ही खात्री मनाला वाटत होती
मित्रांनो या सगळ्यांवरती आज पाणी फिरलं होतं
निरागस आम्ही मुली एकेक बळी मात्र ठरत होतो
सुंदर आयुष्य जगायचंय स्वप्न मी बघत होते
आयुष्यात खूप काही करायचंय मनाशी मी ठरवत होते
परंतु दुष्टांनी स्वप्नांचा घात माझ्या केला होता
बलात्काराच्या विळख्यात जीव माझा गुदमरला होता
रात्र बाकी होती कोणाचीतरी जीवनसाथी बनण्याची
दारासमोर मंडप होता साथ होती सनई-चौघड्यांची
शरीरावरती नजर पडली बरबटलेल्या नजरांची
एका क्षणात झाली राख-रांगोळी माझ्या त्या स्वप्नांची
प्रश्न केला समाजाला काय होतंय हे
माझ्याबरोबर
समाज येतो माझ्या कपडे-वागण्या बोलण्यावर
मन तुमचे साफ का नाही का बनतात बरबटलेल्या नजरा
एक क्षण तुमच्या घरी आहे आई-बहिण हे मात्र आठवा
बलात्कार झाल्यावर मित्रांनो कविता-लेख लिहिल्या जातात
चार दोन मेणबत्त्या लावून सांत्वना तेवढ्या दिल्या जातात
आठ दिवसांनी मित्रांनो पुन्हा सगळं सुरळीत होते
अन पुन्हा एक निर्भया बनल्याची घटना तेवढी कानी येते
चार-दोन मेणबत्त्या लावण्यापेक्षा मित्रांनो विचार एक करा
बलात्कार करणाऱ्यांना उभं जाळून मारा
मित्रांनो मी सांगते त्यावर विचार करा एकदा
अन नाही केला विचार तर तुमच्या घरामध्ये निर्भया बनणार एकदा
मित्रांनो आज असं वाटतंय आईच्या गर्भातच मी सुरक्षित होते
आज बनली आहे निर्भया समाजाची कीव तेवढी येते
मित्रांनो स्वातंत्र्याचा हक्क तेवढा मला द्या आनंदानं जगू द्या
अन अजून एक निर्भया बनवण्याआधी समाज तेवढा बदलू या