भिती
भिती


हरवण्याची भीती कसली
काय आहे तुझे इथे
कसला तो माज अंगी
क्षणभंगुर आयुष्य जिथे||१||
स्वार्थापायी मांडला छळ
तरी नाही फिकीर कसली
किती करता जीवाचे चोचले
का जाणिवांची मती नासली||२||
मिटणार आहे सारे
होणार आहे माती त्याची
का साठवण्याचा हट्ट
सुकणार आहे बाग ज्याची||३||
ना नफा ना तोटा कसला
विसरतील ओळख तुझी
कर्म करणे हातात जरी
का वाहतोस गर्वाची ओझी||४||
मुठभर गरजांसाठी तुझ्या
ओततोस धनाच्या राशी
गोरगरिबांना मिळते जिथे
रोज पोटा पाण्याला फाशी||५||