STORYMIRROR

Tejaswini sansare

Inspirational Others

3  

Tejaswini sansare

Inspirational Others

भिमाची रमाई

भिमाची रमाई

1 min
249

७ फेब्रुवारी १८९८ रोजी, 

वंणदगावी जन्मली माता रमाई, 

पीडित शोषित पोरक्या समाजाला , 

मिळाली ग पुण्यवान आई......! 


होती दिसायला सुरेख, 

भिकू धुत्रेची गं ती लेक, 

रामजी ची सुन नेक, 

होती रमाई लाखात एक......! 


१९०६ साली भायखळा मार्केटमध्ये,  

लहानपणी गरिबीतच झाले लग्न, 

भीमा साठी रमाच योग्य,  

लग्नात नाही आले काही विघ्न.......! 


फाटक्या लुगड्यात नांदली, 

पण दिन सोन्याचे बितविले, 

ढाल बनवुनी छातीशी,  

बाबासाहेबांना शिकू दिले......! 


असे गरीबीचा पाठी घाव,  

तरी प्रेमळ तिचा स्वभाव, 

जगी असे एकही नाही गाव,  

जिथे रमाईचं नाही नाव......! 


नेहमी खंबीरपणे दिली साथ,  

बाबासाहेबांच्या असे सदैव पाठी, 

राहिली गरिबीत उपाशीपोटी,  

फक्त बाबांच्या शिक्षणासाठी......! 


संसारी सोसल्या कित्तेक कळा,  

खाल्ल्या गरिबीच्या झळा, 

लावला दीनदुबळ्यांना लळा, 

फुलवला नवकोटीचा मळा......! 


धन्य झाले बाबाही,  

बघुनी रमाई चा स्वभाव, 

दलितांची आई होती,  

माता रमाई तिचं नाव......!  


तळा-गाळातील गरीबांच्या रक्षणासाठी, 

नष्ट केली अंधाऱ्या अज्ञानाची खाई, 

पेटवून तेजस्वी मशाल शिक्षणासाठी, 

अशी एकती विलक्षण बाई नाव तिचे रमाई......! 

 

तुझ्या कार्याचे होऊ कसे उतराई, 

भिम झाला बाप, रमा झाली अंगाई, 

पुण्यवान, धैर्यशील, हिंमतवान बाई, 

जगात कीर्तिवान दीन-दलितांची आई......! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational