भिकारी
भिकारी
रस्त्यावरून चालत जाणारा तो माणूस ...
लांबलचक भुरकटलेलं केस ...
चेह्रऱ्यावर पडलेल्या आठ्या ...
मळकटलेले कपडे ...
वयाच्या आधारासाठी पकडली काठी
काही खायला मिळेल ह्या आशेने सोबत ठेवलेली पिशवी ...
चालून चालून थकलेला त्याचा जीव ...
भिकारी म्हणावं त्याला कि परिस्थितीने ग्रासलेला ...
शून्यात नजर घालून जीवनाकडे पाहणारा ....
भीक मागणं त्याला आवडत असेल का कि आहे मजबुरी
माहित नसते त्याच्या जीवनाची कहाणी
लोकांच्या मात्र नजरेची असते त्याला शेरेबाजी ....
