भेगा
भेगा
पाण्याविना पडल्या जमिनीला भेगा
आयुष्याचे असेच भोग भोगा
किती सारे एकमेकात गुरफटतात
मायेचा पाझर अटवत जातात
निवांत स्थिरपणे मजा घेत
मोजमाप घेऊन फारकत घेत
तुकडे पडून लांब फेकून
फेकलेल्या भावना बघतात मोजून
भेगा नुसत्या निमित्त आहेत
त्यातील जखमा विचित्र आहेत
