भावनांचा बाजार
भावनांचा बाजार
© भावनांचा बाजार
एकटेच शब्द माझे , सोबतीला सुर नाही
डोळ्यात दु:ख , पण आसवांचा पूर नाही
आज पर्यंत भेटलीत अनेक चंद्र आणि चांदणे
पण एक ही चांदण्यात , तो नूर नाही
ह्रदयाला पोहचवाल ठेच माझ्या
ऐवढा कमजोर ह्रदयाचा, मी नाही
मांडला असला भावनांचा , बाजार जरी
पण इतका लाचार अजून , मी नाही
कवडी मोलात तुम्ही , विकत असाल भावना
विकेल भावना , तो दलाल मी नाही
