STORYMIRROR

Rohit Hivarkar

Inspirational

3  

Rohit Hivarkar

Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
654


तुझ्यासाठी आम्ही, बंधने लादतं आलो

संधी तुला न देता, मागे खेचतं आलो


तू निमुटपणे सहत राहली, किणकिणत राहिली

हुकूम तुझ्यावरती, आम्ही गाजत आलो


क्षमता तुझ्यात होती, बुद्धीमत्ता ही होती

फायदा घेत विवेकाचा, तुला दाबत आलो


महती तुझ्या कार्याची, आम्ही मागेच ठेवली

तुला मागे करत आम्ही, स्वत: समोर आलो


मिळाली आता संधी, अधिकार, पराक्रम तुझा दाखव

आणि झालेल्या चुका आम्ही, आता मागे सारत आलो



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational