धर्मांत गुंतलेला माणूस
धर्मांत गुंतलेला माणूस
1 min
567
काय सांगू माणसा
किती तु बदलला
जन्म दिलेल्या मातीला
आता तू विसरला
रक्त तर तू कधीच
भगवे, पिवळे, निळे केले
झेंडे ही आम्ही आता
त्याच रंगांचे केले
मानवतेचा खरा धर्म
हल्ली पुस्तकांत वाचतो आम्ही
जाती धर्मात नुसत
हल्ली भांडत असतो आम्ही
धर्मांचे ठेकेदार तर आम्ही
केव्हाच ठरवुन घेतले
याच बळावर त्यांनी
हात धुवून घेतले
त्यांच्याच तालावर हल्ली
नाचत असतो आम्ही
आतापर्यंत रक्ताचे पाट
वाहत आलो आम्ही
काय कुणास ठाऊक
कधी संपणार हा खेळ
कधी येणार माझ्या देशात
आता एकतेचा मेळ
