STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Abstract

3  

Kalpana Nimbokar

Abstract

भावना

भावना

1 min
246

कितीही मनात उमलल्या

तरीही या भावफूलांची

पायधूळ ठरलेलीच...

कधीही... केव्हाही... कुणीही...

हव्या तेव्हा कुस्कराव्या...

चिरडून टाकाव्या...

अशा या भावना...


हलक्या गरम झुळूकीतही

सुकणार्‍या... मुरडून जाणार्‍या...

कोमल भावना... अगदी

साध्या कारणानेही

अमर्याद चिरत जाणार्‍या...

दु:खाच्या पावसात

मनाच्या चिखलात...

गडप होऊन जाणार्‍या...


तरीही...

कधी सलत राहाणार्‍या

या कोमल भावना... 

कर्तव्यापुढे नगण्य ठरणार्‍या

या भावना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract