Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

काव्य रजनी

Tragedy

4  

काव्य रजनी

Tragedy

भावना कल्लोळ

भावना कल्लोळ

2 mins
22.7K


भावनांच्या आहारी

कधीच जायचं नसतं

मन थव्यांच्या यौवनात

मनमुराद न्हायचं असतं


माझ्या मनात आले

मी स्वर्ग पहुडले

माझ्या भावांना कशा

जाळ्यात अडकले


भावनांचा कल्लोळ

जशी पानांची सळसळ

तुझी झऱ्यापरी झुळझळ

तुझे होण्या मन माझे व्याकुळ 


माझ्या मनात ती होती

सख्या साजणाची साथ

भावना माझ्या मनात

आणि प्रेमाची ती आस


तुटत्या ताऱ्याकडे मी

नेहमीच तुझं सुख मागत आले

इतकी वेंधळी कशी भावना

तुला मागायचंच विसरून गेले


दूर गेलास माझापासून 

विरह तुझा सोसवेना...

हसू दिसते ओठांवर जरी

सावरू कशा रे भावना...


सुखाच्या क्षणांनी बावरले

प्रीतीत तुझ्या मी विसावले

साथीने आयुष्य सुंदर 

सप्तरंगात भवनात मी सुखावले 


प्रेमात पडल्यावर शब्द 

खारट आंबट तिखट असतात

भावना दुरावली तर कडू होतात

पण जवळ आले की गोड लागतात


तू जिंकणार असशील तर 

मी हारायला तयार आहे

जिंकणं हरणं महत्त्वाचं नाही 

तू व तुझ्या भावना महत्वाच्या आहे


तुझी स्वप्नं पाहताना

झाले किती दुःख

सगळ्या भावना एकवटल्या

मग हलकेच आले सुख


स्वप्ने सगळी भंग होतात

कुणी दुःख दिल्यावर

भावना सगळ्या विरूनी जातात

प्रेम सोबत नसल्यावर


ठेच लागली 

जखमा झाल्या

अशा कशा तुझ्या

भावना मेल्या


प्रपोज वगैरे काय असतं

कसला असतो गेम 

भावना कधी तुडवेल

कुणी त्याचा नाही नेम


कितीही मारले शब्द

कितीही लढल्या मोहिमा

भावना संपल्या आता

काहीही सहन होईना


विरह होऊ न कुणाचं

कधी लागो ना रे आशा

भावना कशा या थांबवू

कशी झाली ही निराशा


जीव जडला तुझ्यात 

किती केली विनवणी

दिस राती मी जागुनी

किती काढल्या आठवणी


विरह सोसवेना आता

करू कसा जीवन प्रवास

भावना किती दडून ठेवल्या

झाल्या आता त्याही भकास


सरलंय आयुष्य माझं

तुझी वाट तशीच आहे,

गेलास तू जीवनातून दूर

भावना मात्र अशीच आहे 


निस्सीम प्रेम आणि जीव

सगळे असतात खोटे

कधी भावना कधी यातना

हेच असते मोठे


अबोला धरून गेलास तू

कधी नाही मागे फिरलास तू

असा कसा स्वार्थी रे तू झाला

माझ्या भावना विसरलास तू


डोळ्यातले पाणी 

असतो अनमोल हिरा 

भावना तोडून त्याला

आई-बापासाठी झुरा


शब्दात सांगणे कठीण आहे

प्रेमाचे नाते अनमोल आहे

भावना कितीही हिरमुसली

मनाचे नाते तर खोल आहे.


व्याकुळ होते मन

किती काढली आठवण

भावना दडल्या होत्या किती

किती केली त्यांची साठवण


मन माझे तुझेच होते

अलगद ते आता कुठे हरवले

तुझ्या माझ्या भावना एकवटून

ओढ अनामिक माझी सावरले


सांज सायंकाळी

मला आठवण झाली

कुणी फुंकर घातली

भावना शिळ घाली


मुळात विरह असतोच का

आपण नेहमी चुकतोच का

भावना जपून चलतोच का

ठेच लागली की रडतोच का??


भावनेने भरलेले

मन माझे रडले रे

तुझ्या जाण्याच्या विरहाने

क्षणोक्षणी मी हरले रे


दडलेल्या प्रेमाची

पावती कधी दिलीस का

भावना व्यक्त केल्या किती

साथ तू माझी सोडलीस का


अश्रू किती रे तू टिपले

आपल्या नात्यात असताना

भावना कीती रे तू जपल्या

आपण एकत्र फिरताना


कुणास पुसावे

कुणाला सांगावे

भावनांचे बंध माझे

आज हरूनी जावे...

आज हरुनी जावे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy