STORYMIRROR

sarika k Aiwale

Abstract

4  

sarika k Aiwale

Abstract

भाव....

भाव....

1 min
234

भेट तुझी माझी स्मरते

रात्र उगाचच का जागते

वाट वळणावर नित्य भेटे

सल काळजात काहूर पेटे

वाद तर नेहमीच होतात

वेळ आहे का सांग बोलायला


अशी हक्क मैत्रीत सांगते

रात्र उशाशी बसुनी झुरते

काल परवा होती एक ती

आज उद्याची पोरकी भाव जगते

वाद तर नेहमीच होतात

वेळ आहे का सांग बोलायला

हुल देतो असा विश्वास ही मग

जग बदलाची भाषा उगा बोलतो

दुर होता नाळ मातीची ती

नाती पुसतात का ओळख कधी ती

वाद तर नेहमीच होतात

वेळ आहे का सांग बोलायला


तुझ तुज जवळ नांदी आहे मोठी

माझं उदारपण त्यात मावेल का थोड़..

जमा होतील थकलेल्या आठवणी

क्षमा होतील का त्या चुका कधी तरी


चुक नव्हतीच अशी दुजी काही

बंध रेशमातला दुवा निकामी झाला

तिच पुसटशी ओळख जपयला

हाक भावनेनी ती  मारली होती

वाद तर नेहमीच होतात

वेळ आहे का सांग बोलायला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract