STORYMIRROR

sarika k Aiwale

Abstract Others

4  

sarika k Aiwale

Abstract Others

भाव मनीचा पुसतो..

भाव मनीचा पुसतो..

1 min
200

जरा जरा विसवतो 

क्षण नात्यात जगतो 

हरवला श्वास कुठे 

भाव मनीचा पुसतो 


जिथे तिथे विरहतो

विश्वास मनी जागतो 

चलबिचल का मनी

भाव मनीचा पुसतो 


कहाणी जुनी वाचतो 

क्षण परतुनी न येतो 

उसंत मिळेल का मज

भाव मनीचा पुसतो 


अभिर गुलाल भारतो 

श्वास नात्यात गुंततो

सत्य तरी का आंधळे

भाव मनीचा पुसतो 


माणुस धर्म जगतो

मनीचे कर्म करतो 

दोलायमान का मनी 

भाव मनीचा पुसतो 


अक्षरास क्षय नसतो 

जीवनास अंत असतो

आसमंतात का वास 

भाव मनीचा पुसतो 


भाव अंतरीची खोलतो 

भावनी श्वास अडकतो

आपुलकी का विसरतो 

भाव मनीचा पुसतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract