STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Romance

3  

Dhananjay Deshmukh

Romance

भाव माझ्या मनातले

भाव माझ्या मनातले

1 min
338

भाव माझ्या मनातले तुला डोळ्यात माझ्या दिसावे,

नकळत वाहणारे पाणी तुला डोळ्यातले माझ्या दिसावे.

पहावे बागेत तुला फुलासारखे उमलताना मी,

आतल्या आत मनमुरादपणे मनाने माझ्या हसावे.

करावा तुला अलगद मायेचा स्पर्श हळुवार मी,

खोडकर लाजण्याने तुझ्या नयनांनी माझ्या फसावे.

लाजलेली तू पाहून व्हावे लाल लाजेने मीही,

घेण्या बाहूपाशात तुला हातानेही माझ्या धजावे.

मग यावे तू अलगद जवळी माझ्या आणि मीही,

स्वप्नं रंगवत आपले उद्याचे तू मिठीत माझ्या बसावे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance