भाऊबीज
भाऊबीज
बंध असावे प्रेमाचे
नाते तुझे विश्वासाचे
नाते पहिल्या मैत्रीचे
नाते भाऊ बहिणीचे
सण आज सौख्याचा
आपुलकी जपण्याचा
देई वचन रक्षण
जन्मभर करण्याचा
आस असते भेटीची
ओवाळणी ती भावाची
केली जाते मनातूनी
खास ती भाऊबीजेची
हीच संस्कृती जपावी
हाच उत्साह रहावा
सण आज दिवाळीचा
गोड शेवटाला जावा
भाऊबीजे सारख्या पवित्र नात्याच्या सणाला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा