भाषा संवर्धन
भाषा संवर्धन
शुक्राची चांदणी नभी जशी
उठून दिसणारा महाराष्ट्र अख्खा
यश,शौर्य,गौरव इतिहास। पानी
सर्वदूर निनादे किर्तीरूपी डंका !!1!!
बहुत सुंदर ऐश्वर्य, संपन्न महान
डोंगरदऱ्या,नद्यापर्वते भू पृष्ठावरी
धरणे, कालवे, सिंचन व्यवस्था सारी
कृषी राबे कष्टाने दादा शेतकरी !!2!!
येथे जाहले थोर वीर शूर संत महंत
इतिहास रचला असा या सुपुत्रांनी
आपल्या दिपविणाऱ्या कर्मातून
इतिहासी अमर केली शौर्य कहाण
ी !!3!!
येथे नांदल्या प्राचीन संस्कृती
इसविसना पूर्वीचा इतिहास
किल्ले, देऊळे, संपदा उध्वस्त
तरी वास्तू देती इतिहासाची साक्ष !!4!!
लाभली मराठी भाषा सोज्वळ
माझा महाराष्ट्र खूप आत्मनिर्भर
रोजीरोटी करिता येती बहू प्रांती
थाटले येथे अनेकांनी अख्खा संसार !!5!!
माझ्या महाराष्ट्रा तू नव्या युगाची आशा,
कोमल,कणखर,समृद्धीचा तू प्रांतीय राजा
नमन तुला मराठी माणसाचा हे देशा
अभिमानास्पद तू महाराष्ट्र देश माझा !!6!!