STORYMIRROR

Chandanlal Bisen

Inspirational

3  

Chandanlal Bisen

Inspirational

भाषा मराठी

भाषा मराठी

1 min
140

भाषा मराठी आपुली

गर्व मराठी भाषेचा

गोडवी किती वर्णावी

गोडवा वाटे अमृताचा


संतांनी रचले अभंग

मराठीच्या कवेत दंग

अर्थ लाभलेया गहन

वर्णास येऊनि रंग


असंख्य शूर मावळे

मराठी भूमी जन्मले

संस्कृतीच्या प्रेरणेने

पराक्रम गाजवले


मातीचा लावून टिळा

क्रांतीची बीजे रोवली

महाराष्ट्राची रणभूमी

शौर्याने खूप गाजली


भू नाही वाण कशाची

साधनसंपत्ती विपुल

येथे संस्कार रुजती

ही ज्ञानस्वरूपा मूळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational