भास
भास
स्वप्न जोडप्याचे
साकार जहाले
चिमणा-चिमणी
सुखाने नहाले
दोघे सुखावले
बाळ आगमने
शुक्लेंदुप्रमाणे
वर्धिष्णु कलेने
हसत खेळत
सारे आनंदात
दृष्ट लागे कशी
भरल्या घरात
कोरोना शत्रूच
बाळावरी घाला
दुःख आवरेना
किती रडे बाला
भास होई मना
चाहूल लागता
येईल गं बाळ
सांजवात होता
भास किती होती!!
बाल विभ्रमांचे
झाली सांजवात
कृष्ण परतीचे
काळ हे औषध
कधी लागू पडे?
भासातच वेडा
जीव तडफडे
