भारतमातेचे गीत गाऊ
भारतमातेचे गीत गाऊ


भारतमातेचे गीत गाऊ,
नतमस्तक चरणी होऊ,
अभिमानाने उर फुलूदे,
गीत स्वातंत्र्याचे गाऊ.
समाजसुधारक थोर सारे,
शूरवीर ते क्रांतीकारक,
प्रणाम शतशः वीरांना त्या,
जे देशासाठी बनले स्मारक.
जन गण मन राष्ट्रगीत हे,
सारे मिळून आपण गाऊ,
भारत माझा देश महान,
सारे एकसंघ एकजूट राहू,
रंक राव हा भेद मिटवूनी,
समॄध्द भारताचे स्वप्न पाहू,
भारतमातेला वंदन करू,
भारतमातेचे गीत गाऊ.