भारतीय शिक्षक दिन...!
भारतीय शिक्षक दिन...!
आज 5 सप्टेंबर भारतामध्ये भारतीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो,आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन.गुरू शिष्यातील पवित्र नाते सदृढ असावे व भावी पिढी सक्षम सदृढ उन्नत उज्वल व्हावी आणि गुरू बद्दल सद्भावना अखंडित रहावी, आदरयुक्त विनयशील विनम्र मनाची जडण घडण असावी म्हणून हा दिवस राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
लहान पणापासून अनेक गुरू लाभतात आणि आपले जीवन घडते म्हणून ज्या ज्या लोकांचा आपले जीवन घडण्यात मोलाचे योगदान लाभले त्या सर्वांना अभिवादन आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
आठवता गुरुस माझ्या
सारे गुरू नजरे समोर आले
ज्यांनी ज्यांनी मोलाचे
संस्कार मजवर आजवरी केले
तळ हातावरचा फोड जपावा
तसे साऱ्या गुरूंनी मज सांभाळले
त्या प्रेमाच्या ऋणात मी जन्मभर
राहतो सुखाने हे सत्य जीवनाचे खरे
नतमस्तक होउनी नमन करावे
सदैव गुरू चरणाशी भजावे
हेच सौख्य शांतीचे खरे साधन
सदैव मिळवून देते जीवनी समाधान
आशीर्वाद गुरूंचा सर्वांना सदैव लाभू दे
सुख समृद्धी सदैव घरी गुरू कृपेने नांदू दे
गुरू चरणाशी शीर नतमस्तक होऊ दे
गुरू दर्शनाने कृतार्थ जीवन होऊ दे...!!
सर्व गुरूंना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
