भारतीय मजूर
भारतीय मजूर


आज ज्याची चर्चा दूरवर तो म्हणजे भारतीय मजूर
आपल्या गावापासून दूर आला मेहनत करण्या
सह परिवार अंग मेहनत करून वनवणा ठरतो
अर्थव्यवस्थेचा कणा
पण जेव्हा येते महामारी कोरोना त्याची हालअपेष्ट बघवेना
त्याला काम नाही पगार नाही डोक्यावर छप्पर नाही
खाण्यापिण्याची सोय नाही गावी परतण्या गाडी नाही
जातो हजारो मैल चालत पायी बायका मुलांसोबत गावी
हजारो संकट येती वाटी तरी त्याला तो न घाबरी
चालत जाता वाटेत गावी निवांत
कुणाचा रेल्वे खाली अंत कुणाचा अन्न पाण्याविना अंत
कुणाचा दमून भागून अंत
मजुराच्या बघून वेदना दगडालाही पाझर फुटे मना
पण मदतीला कुणी जाईना प्रश्न कुणी सोडवेना
नसेल हा मजूर प्रश्न पडतील जरूर
मेहनतीचे काम नाही होईल दूर
अर्थव्यवस्था होईल कमजोर स्वाती वक्ते