भारताचा ढाण्या वाघ
भारताचा ढाण्या वाघ
भारताचा वायूपुत्र ढाण्या वाघ
अभिनंदन मायदेशी परतला
प्रत्येक भारतवासियांचा जीव
अभिनंदन तुमच्यात गुंतला....
शत्रूच्या हद्दीत सुध्दा वाघाने
एक ही शब्द उघडला नाही
भारताचा 56 इंच छातीचा
अभिनंदन शेर मागे हटला नाही...
तब्बल साठ तास होता अडकला
वाघाबाॅर्डरवरून हा वाघ परतला
वायूपुत्राचा आम्हां अभिमान आहे
भारतमातेचा सुपूत्र मायदेशी आला...
वायूपुत्र अभिनंदन वर्धमान तुम्हां
भारतवासियांचा सलाम आहे
निधड्या छातीच्या वाघाचा या
आम्हांला सार्थ अभिमान आहे....
देशभक्ती तुमच्या नसांनसात आहे
संपूर्ण भारत देश दोन दिवस झाले
प्रत्येक क्षणाला वाट पहात पहात
आज वाघाला पाहून धन्य झाले...