STORYMIRROR

काव्य चकोर

Inspirational

4  

काव्य चकोर

Inspirational

भारत मातेचे लाल

भारत मातेचे लाल

1 min
482

भारत मातेचे पुत्र महान

मूर्ती लहान पण किर्ती महान..

कणखर तुमच्या नेतृवाचा

आहे आम्हास सार्थ अभिमान..!!


जय जवान जय किसान

नारा अतुल्य अमोघ दिला..

श्रेय देवून श्रमिकांस सारे

देश प्रवाह एक केला..!!


जरी मेणाहुन मऊ तुम्ही

तरी कठिन समयी बनले लोह..

भयकंपित शेजारी शत्रु

आला शरण मावळला द्रोह..!!


शतशत नमन तुम्हास शास्त्री

तुमचे कर्तुत्व अतिविशाल..

चिरंतर ठेवू हृदयी तेवत

तुमच्या अमूल्य विचारांची मशाल..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational